माखजन हायस्कूल येथे बुरंबाड च्या माहेरवाशिणींचे स्नेहसंमेलन

माखजन |वार्ताहर :     संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल येथे शाळेच्या माजी विद्यार्थीनी व बुरंबाड गावच्या माहेरवाशिणींचा स्नेहमेळवा झाला.एकाच गावातील माजी विद्यार्थी एकत्र येऊन शाळेत स्नेहमेळवा होण्याची पहिलीच वेप होती.

याचं वेळी संस्था संचालित तंत्रशिक्षण विभागाची नव्याने सुरवात करण्यात आली.यामध्ये विद्यार्थी स्वयंपूर्ण व्हावा,छोट्या छोट्या तांत्रिक गोष्टी कळाव्यात ह पद्धतीने प्रशालेचा स्वतःचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तंत्रशिक्षण विभागातील ज्येष्ठ शिक्षक संतोष कुलकर्णी यांनी अपार मेहनत घेतली. तंत्रशिक्षण विभागाचे देणगीदार कै.सुलभा मोरेश्वर जोशी यांचे पुतणे श्री दिलीप जोशी यांचे हस्ते या विभागाचे उदघाटन करण्यात आले.

या कार्यक्रमातच प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री शशिकांत वैश्यंपायन यांनी वेटलिफ्टिंग साहित्याची देणगी दिली.या साहित्याचे,त्यांच्या हस्ते शालार्पण करण्यात आले.दरम्यान या कार्यक्रमात अद्ययावत असा मुख्याध्यापक कक्ष व कार्यालयासाठी देणगी दिलेल्या श्री श्रीकृष्ण उर्फ नंदू भाऊ नामजोशी यांच्या पत्नी सौ शिल्पा नामजोशी यांना शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी त्यांच्या दोन्ही मुली उपस्थित होत्या.

या संपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष श्री आनंद साठे उपस्थित होते.तर व्यासपीठावर सचिव राजेश फणसे,संस्था संचालक विवेक केळकर,सतीश साठे,माजी संस्था अध्यक्ष दिलीप जोशी,मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,अन्य मान्यवर उपस्थित् होते.

यावेळी माहेशिणींचे यथोचित

आदरातिथ्य करण्यात आले.यावेळी माहेरवशिणींनी मनोगत व्यक्त केले.औक्षण,रक्षाबंधन असे विविध कार्यक्रम झाले.शाळेने केलेल्या आदरतिथ्या मुळे भारावून गेल्याच्या भावना व्यक्त केल्या.यावेळी सचिव राजेश फणसे, अध्यक्ष आनंद साठे यांनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाला उदय नामजोशी,सुहास नामजोशी,विनायक नामजोशी व मोठ्या संख्येने माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर यांनी केले.सूत्रसंचालन गौरव पोंक्षे तर आभार सचिन साठे यांनी मानले.