प्रधानमंत्री आवास योजनेत करुळ ग्रामपंचायत जिल्ह्यात द्वितीय

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

सरपंच नरेंद्र कोलते यांनी लाभार्थी व ग्रामस्थांचे मानले आभार

वैभववाडी l प्रतिनिधी :   प्रधानमंत्री आवास योजनेत करुळ ग्रामपंचायतीने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण ओरोस येथे जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, पोलीस अधीक्षक श्री अग्रवाल, वैभववाडी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब व अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

करुळ सरपंच नरेंद्र कोलते, उपसरपंच सचिन कोलते, ग्रामसेवक शशिकांत गुरव पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त करुळ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी यांचे वैभववाडी तालुक्यात अभिनंदन केले जात आहे.

पुरस्कार मिळाल्यानंतर सरपंच नरेंद्र कोलते यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील करुळ गावातील सर्व लाभार्थी व ग्रामस्थांचे आभार मानले.