देवगड(प्रतिनिधी)
देवगड शहरांमध्ये महालक्ष्मी ज्वेलर्सचे मालक संजय सोमण यांनी नव्याने श्रीइमिटेशन ज्वेलरी शोरूमचा प्रारंभ केला. आज रविवारी या शोरूमचा शुभारंभ कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. देवगड कॉलेज रोड येथील सौरभ कॉम्प्लेक्स येथे हे शोरूम सुरू करण्यात आले आहे. देवगड तालुक्यामधील हे पहिले शोरूम आहे. देवगड या शोरूममुळे महिला वर्गांना असंख्य व्हरायटी असलेल्या मनपसंत अशा इमिटेशन ज्वेलरी खरेदी करायला मिळणार आहे .या शोरूमच्या शुभारंभाप्रसंगी आमदार नितेश राणे, संजय सोमण, श्री इमिटेशन ज्वेलरीच्या मालक सौ स्वाती सोमण,संयम सोमण, आयुषी सोमण, श्रीमती मंगला सोमण भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, माजी नगराध्यक्षा सौ प्रियांका साळस्कर, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, दिनेश सोमण,डॉ प्रमोद आपटे, डॉक्टर पुष्कर आपटे सुमित भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.या शोरूमला देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी देखील भेट देऊन शोरूमचे मालक श्री व सौ सोमण यांना यांना शुभेच्छा दिल्या.










