चिपळूण (प्रतिनिधी) : अपना सहयोग फाऊंडेशनचे चेअरमन झरीन रूमानी व लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी आणि युवक कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष साजिद सरगुरोह यांच्या संयुक्त विद्यमाने गोवळकोट रोड येथे कॉंग्रेस पक्ष कार्यालयात शनिवार दि. ९ जुलै रोजी हृदयविकार, जनरल सर्जरी, युरोलॉजी, ऑर्थोपेडीक व पॉलिट्रॉमा, पोटविकार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शहर भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने आरोग्य शिबीर श्री. सरगुरोह यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेहोते. यावेळी लाईफलाईन सुपर स्पेशालिटी मिरजचे तज्ज्ञ डॉक्टर वर्ग व त्यांची सर्व टीम उपस्थित होते. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये गोवळकोट, गोवळकोटरोड तसेच शहर भागातील सुमारे १५० रूग्णांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. श्री. सरगुरोह यांनी अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये रूग्णांना या शिबिरामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबीर उपलब्ध करून दिले.












