लांजा (प्रतिनिधी )तालुक्यातील आगवे जोशी गावातील सर्व ग्रामस्थ, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला.

सदरचा पक्षप्रवेश कार्यक्रम हा पार पडला. सर्व प्रवेशकर्त्यांचे उद्योजक अण्णा सामंत यांनी पक्षाची शाल घालून स्वागत केले. यावेळी अण्णा सामंत यांच्यासह जिल्हा प्रमुख राहुल पंडित, क्षेत्रप्रमूख राजू कुरूप,लांजा तालुका प्रमुख गुरूप्रसाद देसाई , तालुका महिला अध्यक्ष सौ. रसिका मेस्त्री ,नगराध्यक्ष मनोहर बाईत, तालुका अधिकारी राजेंद्र धावणे ,गणेश लाखण हे उपस्थित होते.
प्रवेश केलेल्यांमध्ये आगवे गावातील गाव प्रमुख अनंत विष्णू रायकर तसेच अनिल गणपत गुरव ,संदिप गुरव ,अशोक मोडक, पिंट्या कांबळे,दत्ताराम जोशी, मंगेश मोरे, माजी सरपंच सौ विनया गुरव, अशोक गुरव , मोरेवाडी प्रमुख रविंद्र मोरे, संजय नेवरेकर, संजय जोशी, चंद्रकांत जोशी, मैथिली रायकर आणि सर्व ग्रामस्थ यांचा समावेश आहे.
कार्यक्रमावेळी आगवे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती विश्वनाथ उर्फ अनिल गुरव यांची लांजा तालुका खानवली पंचायत समिती गण विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. अनिल गुरव यांनी आपल्या भाषणात आपल्या विभागातील सर्व ग्रामस्थ उपस्थित यांचे आभार मानले व आणि आपल्या विभागातील सर्वांगी विकास करण्यासाठी ग्वाही दिली….











