पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा समाजाचे अध्यक्ष शरद मेस्त्री यांचा सत्कार

 

वेंगुर्ले : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मा समाजाचे अध्यक्ष व भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस वेंगुर्ले येथील शरद मेस्त्री यांचा आज दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
एम एस एम ई मंत्रालय स्तरावरील ‘विश्वकर्मा कौशल्य योजना’ उदघाटन हा दिल्ली येथील शासकीय कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.