सेवा पंधरवडा यशस्वी करणार : संदीप साटम

देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा होणाऱ्या सेवा पंधरवडा
कार्यक्रमाची सुरवात कणकवली विधानसभेतील देवगड ,कणकवली ,वैभववाडी या तीनही तालुक्यात मोठ्या उत्साहात करण्यात आली अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी दिली आहे

या उपक्रमाची सुरुवात आयुष्यमान भारत या उपक्रमाने करण्यात आली हे उपक्रम यशस्वी होण्यासाठी मंडल अध्यक्ष ,युवा मोर्चा ,सेवा पंधरवडा विधानसभा समिती सदस्य ,पक्ष पदाधिकारी ,प्रमुख कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली .पुढील सर्व उपक्रम याही पेक्षा मोठ्या उत्साहात पार पडतील हीच अपेक्षा अशी अपेक्षा सरचिटणीस संदीप साटम यांनी व्यक्त केली आहे