ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या तीन एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; पहिल्या दोन सामन्यांसाठी केएल राहुलकडे नेतृत्व

 

नवीदिल्ली- आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या तीन एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया विरूध्दच्या सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. २२ ते २७ सप्टेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वनडे सामने होणार आहेत. पहिल्या दोन सामन्यांसाठी घोषित केलेल्या संघात रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्याला विश्रांती देण्यात आली आहे. तर टीम इंडियाचं नेतृत्व केएल राहुलकडे देण्यात आलं आहे.

मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी वेगळी आणि तिसऱ्या सामन्यासाठी वेगळ्या संघाची घोषणा केली आहे. तर टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची संघात वापसी झाली आहे. अक्षर पटेलची देखील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. केएल राहुल (कर्णधार, यष्टीरक्षक), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन,सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, वाशिंगटन सुंदर या खेळांडूंना पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. तर रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, हार्दिक पांड्या, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अक्षर पटेल (*) रविचंद्रन अश्विन, वॉशिंगटन सुंदर या खेळाडूंना तिसऱ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना हा शुक्रवारी २२ सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. हा सामना मोहाली येथे होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना हा इंदोरच्या होळकर मैदानात होणार आहे. हा सामना रविवारी २४ सप्टेंबरला होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना हा राजकोटला खेळवण्यात येणार आहे. हा तिसरा आणि अखेरचा सामना हा बुधवारी २७ सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना हा शुक्रवार २३ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना हा २६ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-२० सामना हा २८ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. हा सामना राजकोटच्या मैदानात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी-२० सामना हा नागपूरच्या मैदानात रंगणार आहे.

हा सामना १ डिसेंबरला खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी- २० मालिकेतील अखेरचा आणि पाचवा सामना हा ३ डिसेंबरला होणार आहे. हा सामना हैदराबादच्या मैदानात रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेनंतर वर्ल्ड कपच्या सराव सामन्यांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिय यांच्यातील टी-२० मालिका हा वर्ल्ड कपनंतर खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ हा साधारण तीन महिने भारतामध्येच असणार आहे. प्रथम वनडे मालिका, त्यानंतर वर्ल्ड कप आणि त्यानंतर टी-२० मालिका खेळून ते भारतामधून निघतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका ही दोन्ही संघांसाठी महत्वाची असेल. कारण त्यानंतर वर्ल्ड कप ही सर्वात मोठी स्पर्धा सुरु होणार आहे. त्यामुळे या मालिकेचा निकाल सर्वांसाठी महत्वाचा असेल. भारताने या मालिकेसाठी दोन संघ जाहीर केले आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी के. एल. राहुल हा भारताचा कर्णधार असेल, तर तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा याचे भारतीय संघात पुनरागमन होणार आहे.