देवगड (प्रतिनिधी) :
घरातील माणसांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी देवू लागल्याने समजविण्यासाठी गेलेल्या एकनाथ शंकर पवार(५९) रा.कुवळे तर्फेवाडी यांना डोकीवर लाकूड मारून दुखापत केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी तेथिलच सुधीर रघुनाथ पवार(४४) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.ही घटना २१ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कुवळे तर्फेवाडी येथील एकनाथ शंकर पवार यांच्या घरात गणेशोत्सव सुरू असताना २१ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता सुधीर रघुनाथ पवार हा दारू पिवून येवून घरातील माणसांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी देवू लागला यावेळी एकनाथ पवार हे त्याला समजविण्यासाठी गेले असता त्यांनी न्हाणी घरातील चुलीसाठी जमा करून आणलेले जंगली लाकूड त्यांचे डोकीवर मारून दुखापत केली व हाताचे थापटाने मारून, धक्काबुक्की करून घरातील माणसांना व त्यांना ठार मारल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी दिली.याबाबतची तक्रार एकनाथ शंकर पवार यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली या तक्रारीवरून पोलिसांनी सुधीर रघुनाथ पवार याच्याविरूध्द भा.द.वि कल ३२४, ३२३, ५०४, अन्वये गुन्हा दाखल केला आहे.तपास पो.हे.कॉ.महेंद्र महाडीक करीत आहे.











