चिपळूणमध्ये राखी संकलन कार्यक्रमप्रसंगी मांडली स्पष्ट भूमिका
चिपळूण (प्रतिनिधी):– हिंदू म्हणून आपल्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. लव्ह जिहाद सारखे प्रकार करू शकत नाही. कारण आपला हक्काचा भाऊ मुख्य खुर्चीवर बसले आहेत. ही भावना प्रत्येक बहिणीच्या मनात आहे. लव्ह जिहादसारखे महत्वाची उदाहरणे आहेत. जेव्हा हिंदू कार्यकर्ते म्हणून आपण पीडितांच्या कुटूंबीयांची भेट घेतो. तेव्हा घरची परिस्थिती पहायला मिळते तेव्हा हिंदुत्व सरकारची गरज का आहे हे लक्षात येते. विकास होतच राहणार आहे. आपण आपल्या राज्यामध्ये हिंदू राष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने हिंदू म्हणून सुरक्षित नसू, आपल्या हिंदू माता-भगिनींना सुरक्षित ठेवू शकलो नाही तर आपण आपल्या पदाला न्याय देऊ शकत नाही अशी प्रत्येकाच्या मनात भावना निर्माण होईल. तेव्हा लव्ह जिहाद सारख्या घटना रोखण्यासाठी हिंदू म्हणून एकत्र यायला हवे. एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला हवे, असे मत्स्य बंदरे विकासमंत्री ना. नितेश राणे यांनी चिपळूणमध्ये आयोजित राखी संकलन कार्यक्रमप्रसंगी स्पष्ट केले.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, रामदास राणे, वसंत ताम्हणकर, भाजपा महिला प्रदेश मोर्चा उपाध्यक्षा सौ. चित्रा चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस राज्याच्या प्रगतीसाठी , विकासासाठी प्रयत्नशील आहेतच तर गृहमंत्री पद सांभाळताना हक्काचा देवाभाऊ म्हणून राज्याचे नेतृत्व करीत आहेत. यामुळेच रक्षाबंधनासारखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यातून प्रत्येक बहिणीच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे. सन २०१४ -२०१९ तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे हिताचे जे निर्णय घेतले आहेत. यातून राज्याचा विकास होतांना दिसत आहे, असे मत मांडले.













