ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावरती लोरे नंबर १ ग्रापचा उपक्रम
कणकवली : माजी सभापती मनोज रावराणे,सरपंच अजय रावराणे यांच्या संकल्पनेतून कणकवली तालुक्यातील लोरे नंबर १ या गावामध्ये सेल्फी पॉइंट “सुंदर माझं गाव लोरे” येथे बनवण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली मतदार संघाचे आमदार श्री. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्यातील ग्रामीण भागात प्रथमच सेल्फी पॉइंट बनवण्याचा मान लोरे ग्रामपंचायतने मिळवला आहे.लोरे गाव जिल्ह्या मध्ये विविध कार्यक्रमांमध्ये नेहमी अग्रेसर असतो.असे गौरोउद्गार आमदार नितेश राणे यांनी काढले. व गावातील सरपंच आणि ग्रामस्थ यांना पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला श्री तुळशीदास रावराणे सिंधुदुर्ग कृषी बाजार समिती अध्यक्ष, मनोज रावराणे माजी सभापती कणकवली,अजय रावराणे सरपंच,सुमन गुरव उपसरपंच,नरेश गुरव, सुनील रावराणे,अनंत रावराणे,बाबा रावराणे,आणि गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.











