सावंतवाडी नगर परिषदेचा उपक्रम
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहराला अनोखे सौंदर्य प्राप्त करून देणारा ऐतिहासिक मोती तलाव देश-विदेशातील पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरतो. याच मोती तलावाचा गाळ काढण्यासाठी उन्हाळ्यात तलावातील पाणी सोडण्यात आले होते त्यामुळे तलावातील मासे कमी झाले होते. त्यामुळे या तलावात पुन्हा माशांची पैदास होण्यासाठी नगरपरिषदेतर्फे सुमारे पंचवीस हजार मत्स्यबीज तलावात सोडण्यात आले.
सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सागर साळुंखे यांच्या हस्ते मंगळवारी नगरपरिषदेच्या मोती तलावामध्ये शेवाळ खाणारे मत्सबीज रोहू व कटला या जातीचे सुमारे २५ हजार मासे मोती तलावामध्ये सोडण्यात आले.
सदरचे मत्सबीज शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर यांनी सिंधूरत्न समृद्ध योजने अंतर्गत मुळदे येथून नगरपरिषदेस मोफत पुरविलेले आहे. अशा प्रकारचे अजून सुमारे एक लाख एवढे मत्स बीज मोती तलावामध्ये सोडण्यात येणार असल्याबाबतची माहिती सागर साळुंखे यांनी दिली.












