श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

सावंतवाडी । प्रतिनिधी :
माजगाव येथील श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या चित्रकला, हस्तकला, रंगावली, स्वनिर्मित वस्तू, चित्रे, रांगोळी यांचे ‘रंगतरंग’ हे प्रदर्शन खास आकर्षण ठरले.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजगावच्या नवनिर्वाचित सरपंच डॉ अर्चना सावंत, उपसरपंच संतोष वेजरे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजगाव शिक्षण सहाय्यक संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार, उपाध्यक्ष नारायण कानसे, सचिव लक्ष्मण नाईक, माजी उपसरपंच संजय कानसे, संस्थेचे संचालक अनंत माधव माजी मुख्याध्यापक एच बी सावंत, आर के सावंत, अँड शामराव सावंत, चंद्रकांत सावंत, बापू सावंत, राजेश तळवडेकर, विजय जाधव, मनोहर मोरये, प्रभाकर कानसे, श्री हरमलकर, श्री सुतार, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी चव्हाण आदी उपस्थित होते