कुडाळ | प्रतिनिधी : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत वार्षिक 436 रुपये भरून काढण्यात आलेल्या विमा लाभधारक वर्षा नेवाळकर तसेच संदीप मांजरेकर या दोन लाभदायकांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये विमा कवच रक्कम सिंधुदुर्ग बँक कुडाळ शाखेच्या वतीने देण्यात आली. यामध्ये वर्षा नेवाळकर यांच्या पश्चात त्यांचे वारस शैलेश नेवाळकर, अमित नेवाळकर यांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले तसेच संदीप मांजरेकर यांच्या मृत्यू पक्षात त्यांचे वारस पत्नी सुप्रिया मांजरेकर यांना दोन लाखाचा विमा रक्कम सुपूर्त करण्यात आला. सदरचा चेक कुडाळ येथील सिंधुदुर्ग बँक शाखेमध्ये जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर श्री ओठवणकर यांच्या उपस्थितीत चेक सुपूर्त करण्यात आला. यावेळी कुडाळ शाखा व्यवस्थापक प्रतीक्षा बागायतकर तसेच बँक अधिकारी व कर्मचारी कर्मचारी उपस्थित होते.
Home सिंधुदुर्ग कुडाळ सिंधुदुर्ग बँक कुडाळ येथे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या लाभार्थ्यांना विमा रक्कम...











