खांदाट पाली गावचे माजी सैनिक श्रीराम महाडिक यांचे वृद्धापकाळाने निधन

चिपळूण (प्रतिनिधी) : खांदाट पाली खालचीवाडी येथील माजी सैनिक श्रीराम बाबुराव महाडिक यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. ते भारतीय सैन्यामध्ये असताना पीटी मास्टर होते. ते खूप रागिष्ट व शिस्तबध्द होते. त्यांनी त्यावेळी आपल्या गावातील व परिसरातील १२ ते १५ जणांना त्यानी सैन्यामध्ये भरती केले. आजही ते लोक सांगतात की, काका होते म्हणून आम्ही भरती झालो व सेवा पूर्ण करू शकलो. त्यांनी भरती केलेली मुलं आज उच्चपदावरून निवृत्त झाली आहेत. त्यांचा स्वभाव रागिट तेवढेच प्रेमळ होते. निवृत्त झाल्यावर ते fci मध्ये कामाला होते. परंतु एका जीवघेण्या अपघातामुळे ते वाचले. त्यानंतर गावी आल्यावर सामाजिक कामात कायम अग्रेसर असत. त्यांना लोक अण्णा या नावाने ओळखत. त्यांच्या पश्चात खांदाटपाली गावचे माजी सरपंच अजय महाडिक व तीन मुलगे. एक मुलगी, सूना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे.