कणकवली : तालुक्यातील ओव्हरब्रिजखाली मागील काही दिवस वाहन पार्किंग मोठ्या प्रमाणात केले जात असल्याचे प्रत्यक्षदर्शी आहेच. मात्र ओव्हरब्रिजखाली असलेली जागा ही स्वतःची असल्यासारखे काही वाहन पार्किंग करणारे चालक दादागिरी ची भाषा करत आहेत. शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान वैभवबार समोरील ओव्हरब्रिजखाली काही व्यक्तींमध्ये मोठी हाणामारी झाली. यात एका व्यक्तीला मारले असल्याची माहिती तिथे असलेल्या काही नागरिकांनी दिली. मात्र या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मारामारी करणाऱ्या त्या युवकांना चांगला प्रसाद दिला. पोलिसांनी सदर मारामारी करणाऱ्यांना तरुणांना ताब्यात घेतले.
यामध्ये स्वप्निल सुभाष पाटील ( कणकवली परबवाडी ), चंदन विकास पाटील ( तरंदळे ), राजेंद्र मधुकर कोकम ( कासरल ), निलेश मोहन कदम ( वरवडे ), राजेश शांताराम परब ( टेंबवाडी ) कणकवली, सुदर्शन सदानंद पालव ( वागदे ), संकेत बांदेकर ( कणकवली ), मंगेश सावंत ( तळवडे ), यांना पोलिसांनी रात्री ताब्यात घेऊन त्यांना समज देऊन सोडण्यात आले. त्यामुळे कुठेतरी अशा प्रकरणाना आळा बसणे गरजेचे आहे.







