सरकार पक्षातर्फे ॲड. तुषार भणगे व ॲड. हृदयनाथ चव्हाण यांनी पाहिले काम
मालवण | प्रतिनिधी : इच्छापूर्वक दुखापत केल्याप्रकरणी मालवण येथील मे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी नं. 2 श्री. एम. आर. देवकते यांनी उमेश काशिराम वारंग, सिद्धेश उमेश वारंग, अभिषेक उमेश वारंग सर्व रा. ता. मालवण या तीन आरोपींना भा.द.वि. कलम ३२३ अंतर्गत दोषी ठरविले आहे. तसेच सदर आरोपींना प्रत्येक रुपये २,००० फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून मे न्यायालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
24 ऑक्टोबर 2020 रोजी पळसंब वरची वाडी येथे सामायिक घरात वादानंतर सदर गुन्हा आचरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. सदर केसचे कामी न्यायालयात सरकार पक्षातर्फे ॲड. तुषार भणगे व ॲड. हृदयनाथ चव्हाण यांनी काम पाहिले.







