रत्नागिरी | प्रतिनिधी : शहरानजीकच्या मिरकरवाडा येथील खडप मोहल्ला याठिकाणी सोमवार 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वा.अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडून आला.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत शब्बीर इब्राहिम राजपुरकर यांनी खबर दिली.सोमवारी सकाळी 11.30 वा.त्यांना मिरकरवाडा येथील खडप मोहल्ला येथे एका अज्ञात पुरुषाचा अंदाजे वय 45 मृतदेह दिसून आला.त्यांनी तातडीने रुग्णवाहिकेतून त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यांनीही त्याला तपासून मृत घोषित केले.










