कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या कायदा सेलच्या जिल्हा संयोजक पदी प्रसिद्ध वकील राजेश परुळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटनेच्या कामात राजेश परुळेकर यांचे असलेले योगदान लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ही नियुक्ती केली आहे. केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे ,माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा सेलचे संयोजक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करणार असल्याची प्रतिक्रिया वकील राजेश परळकर यांनी दिली.












