रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेत प्रि. एम. आर. देसाई इंग्लिश मिडियम स्कूल, वेंगुर्ला चे यश

वेंगुर्ले | प्रतिनिधी : रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धा मुंबई यांच्यातर्फे 2023-24 मध्ये घेतलेल्या विविध स्पर्धेत वेंगुर्ले येथील प्रिं. एम. आर. देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या मध्ये नॅशनल सिल्वर अवार्ड कु. आर्या कुडाळकर, आर्ट मेरीट अवार्ड कु. केतकी चेदंवणकर व कु. चिन्मय पेडणेकर, विशेष पारितोषिक कु. वेदा देसाई, कु. आस्था कुडाळकर, कु. प्राप्ती मोरे, कु. तनिशा सातार्डेकर तसेच शाळेच्या 16 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक , 15 विद्यार्थ्यांनी रौप्य, व 11 विद्यार्थ्यांनी कांस्य पदक प्राप्त करत यश संपादन केले.

सर्व विध्यार्थ्यांना शिक्षिका सौ. संजया परब यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मिताली होडावडेकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.