वेंगुर्ला l प्रतिनिधी : वेंगुर्ला-गाडीअड्डा येथील रहिवासी चंद्रकांत दत्ताराम केळजी (७०) यांचे १६ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई असा परिवार आहे. न्यायालय अधिक्षक कै. मोहनदास केळजी यांचे ते भाऊ तर अॅड.सुधा केळजी, सावंतवाडी तहसिलदार कार्यालयातील वरिष्ठ लिपिक मंगल केळजी व वेंगुर्ला पंचायत समितीचे कर्मचारी बापू केळजी यांचे ते वडील होत.












