माखजन शाखेत ग्राहकांसाठी मिठाई वाटप व योजनांची माहिती
माखजन |वार्ताहर : जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे च्या अमृत महोत्सवी वर्षाला प्रारंभ होत आहे.या निमित्त बँकेच्या माखजन शाखेत ग्राहकांना मिठाई वाटप करण्यात आले.शिवाय ग्राहक हिताच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.यावेळी ग्राहकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी शाखा व्यवस्थापक श्री चिन्मय साने,सहाय्यक शाखा व्यवस्थापक श्री अमोल अंतरकर लेखनिक अनंत शिगवण,केदार आंबेकर,अक्षय शिंदे श्री चारुदत्त भिड़े श्री सुमित घडशी व श्री सुधाकर गुरव आदी उपस्थित होते.