नामदार राणेंच्या कणकवली सार्वजनिक नवरात्रौत्सवात भक्तीगीत व भावगीतांची रंगणार मैफिल
कणकवली : कणकवली सार्वजनिक नवरात्रौत्सवानिमित्त केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालय येथे लोक आग्रहास्तव नवज्योती भक्तीगीत व भावगीतांचा कार्यक्रम २१ ऑक्टोबर २०२३,रोजी सायं. ७ वाजता होणार आहे. यासाठी सुर नवा ध्यास नवा ची उपविजेती संज्योती जगदाळे आणि सारेगमप फेम नवाब शेख हे हा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यांना हार्मोनिअम साथ अमित मेस्त्री ,तबला किशोर सावंत,मृदंग – आनंद मोर्ये,निवेदक म्हणून प्रफुल्ल वालावलकर काम पाहणार आहे.सर्वांनी या संगीत कार्यक्रमांचा आनंद घ्यावा असे आवाहन भाजप च्या वतीने करण्यात आले आहे.












