गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची उपस्थिती
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे दरवर्षी दिले जाणारे २०२३ चे पुरस्कार या पूर्वी जाहीर केले होते.हा पुरस्कार वितरण सोहळा पाच नोव्हेंबरला कळसुलकर हायस्कूल सभागृहात सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर उपस्थित राहणार आहेत.
अध्यक्षस्थानी प्रा.अरुण पणदूरकर, प्रमुख अतिथी सौ.अर्चना घारे -परब, शैलेश प ई, आदि मान्यवरांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत.
पुरस्काराचे मानकरी…सौ.सीमा पंडित (दोडामार्ग) प्रा.संतोष जोईल (फोंडाघाट) पांडुरंग दळवी (वजराट.. वेंगुर्ले) निलेश मोरजकर (बांदा) प्रकाश कानूरकर (कट्टा -मालवण) उत्तम फोंडेकर (कुंभार माठ.. मालवण) या उपक्रमशील व्यक्तिंना मंडळातर्फे सन्मान चिन्ह शाल श्रीफळ गौरव पत्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. सामाजिक भान ठेवून विधायक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी या उद्देशाने हे मंडळ कार्यरत आहे
गेली सतरा वर्षे सातत्याने हा उपक्रम राबविला जात आहे. तरी या विधायक कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन वाय.पी.नाईक, जावेद शेख, निलेश पारकर,एस.आर.मांगले, प्रा.रुपेश पाटील यांनी केले आहे












