ज्युदो- कबड्डी मधील फोंडाघाट चा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध ! – उपसरपंच तन्वी मोदी.

सिंधुदुर्ग जिल्हा आझाद ज्यूदो असो.चा ३० वा वर्धापन दिन उत्साहात!

खेळाडूंचा मान्यवरांनी केला गौरव

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी— सिंधुदुर्ग जिल्हा आझाद ज्युदो असोसिएशनचा तिसावा वर्धापन दिन,संस्थेच्या संकुलात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष संजय आग्रे, उपसरपंच तन्वी मोदी, माजी सभापती सुजाता हळदीवे, पोफळेसर अभिनंदन डोर्ले, केदार रेवडेकर, विश्वनाथ जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शुभेच्छा देताना संजय आग्रे यांनी, संस्थेमधून विविध स्पर्धात्मक उपक्रमातून नवनवीन खेळाडू निर्माण व्हावेत, त्यांनी राज्यात- देशात फोंडाघाट गावासह संस्थेचे नाव उज्वल करावे, यासाठी शासकीय स्तरावरील मदतीसाठी नेहमी सहकार्य राहील असे आश्वासन दिले. सुजाता हळदीवे यांनी गुणवंत खेळाडूंचे आणि संस्थेच्या कामाचे, तसेच प्रशिक्षकांचे कौतुक करून, भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. फोंडाघाट गावचा गेल्या कित्येक वर्षाचा कबड्डी- ज्युदो मध्ये दबदबा कायम असल्याचे सत्कारमूर्तींनी सिद्ध केले आहे. त्यांच्या प्रयत्नांना “आझाद” चे पाठबळ मिळावे आणि ग्रामपंचायतीचेही आमचे कडून सहकार्य मिळेल याची ग्वाही, उपसरपंच तन्वी मोदी यांनी देऊन त्यांचा गौरव केला.

कुमारी गायत्री राठोड (बुद्धिबळ स्पर्धेत राज्यस्तरीय निवड) कुमारी तन्वी पवार (खेलो इंडिया सहभाग, मिनी ओलंपिक कान्सपदक विजेती) अजिंक्य पोपळे ( मिनी ओलंपिक चतुर्थ क्रमांक) दुर्वांकुश मेस्त्री (जिल्हास्तरीय ज्युडो प्रथम क्रमांक आणि शालेय कबड्डी स्पर्धेत द्वितीय ) या गुणवंत खेळाडूंना मान्यवरांचे हस्ते पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या कार्याचा आढावा भाई गुरव यांनी आपल्या प्रस्तावनेतून केल डोर्ले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी दीपक ईश्वलकर,भाई गुरव ,भाई नराम, लॉरेन्स करवालो यासह खेळाडू – पालक – शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…..