मंडळ सजावट स्पर्धेत आंबेआळी मित्रमंडळ प्रथम …!
भालचंद्र महाराज जन्मोत्सव दीपोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर …!
कणकवली | प्रतिनिधी : परमहंस भालचंद्र महाराज यांच्या 119 व्या जन्मोत्सवानिमित्त भालचंद्र महाराज संस्थान व वाळकेश्वर मंगल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ते 13 जानेवारीदरम्यान दीपोत्सव स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतंर्गत मंडळ, घर सजावट व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. घर सजावट स्पर्धेत दिप्ती म्हाडगुत हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. द्वितीय क्रमांक मनोज कोदे तर तृतीय क्रमांक गंधार निखार्गे यांनी प्राप्त केला. उत्तेजनार्थ पारितोषिक विजय पारकर, यशवंत महाडिक,पायल डिचोलकर यांनी पटकाविले. मंडळ सजावट स्पर्धेत आंबेआळी मित्रमंडळाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. रांगोळी स्पर्धेत मोनिका कोदे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. द्वितीय तन्वी ओरसकर यांनी तर तृतीय क्रमांक अक्षता कोदे यांनी प्राप्त केला. उत्तेजनार्थ पारितोषिक वैशाली काणेकर व पायल डिचोलकर यांनी प्राप्त, केले. सुजान नागरिक हे पारितोषिक सागर जावडेकर याला मिळाले.या स्पर्धांमध्ये स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. यावेळी भालचंद्र संस्थानचे व्यवस्थापक विजय केळुस्कर,खजिनदार दादा नार्वेकर,अँड प्रवीण पारकर,उमेश वाळके,प्रसाद अंधारी,राजन पारकर,निवृत्ती धडाम,गजानन उपरकर,काशिनाथ कसालकर, श्रीरंग पारगावकर,रमेश काळसेकर परीक्षक रविकिरण शिरवलकर आदी उपस्थित होते.या कार्यक्रमात सूत्रसंचालन व आभार बाळू वालावलकर यांनी मानले.