मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत वाल्मिकीनगर महायुतीतील मित्रपक्षांमध्ये थेट निवडणूक होणार आहे. येथे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजप या पक्षांनी आपआपले पुरस्कृत पँणल परस्पर विरोधात उभे केल्याने तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीने आपला एकही उमेदवार उभा केला नाही असे असताना मित्रपक्षांची येथील परस्पर विरोधी भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.
मंडणगड तालुक्यातील 3 ग्रामपंचायतीच्या निवडणूक होत असून यापैकी तोंडली ग्रामपंचायत मध्ये ग्रामस्थांनी उमेदवार बिनविरोध दिल्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये मतदान प्रक्रिया होणार नाही. उर्वरीत वाल्मिकीनगर व उन्हवरे ग्रामपंचायती मध्ये निवडणूक होणार आहे. दोनही ग्रामपंचायतीत सरपंच पदासह आठ जागांकरीता मतदान होणार आहे. यापैकी वाल्मिकीनगर ग्रामपंचायतीमध्ये 7 जागांकरीता निवडणूक असून यापैकी 4 जागा अनुसुचित जाती जमाती करीता आरक्षण पडले आहे. या आरक्षणाचे एकही उमेदवार नसल्याने या चारी जागा रिक्त राहणार आहेत. उर्वरीत तीन सदस्य व सरपंच पदाकरीता मतदान होणार आहे. याकरीता महायुतील युतीधर्म न पाळता मित्रपक्षांनी परस्परविरोधी उमेदवार उभे केले आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत पँणलचे चार उमेदवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट पुरस्कृत पँणलचे चार उमेदवार व भाजप पुरस्कृत तीन उमेदवारांमध्ये तिरंगी व अटीतटीची लढत होणार आहे.
सरपंच पदाकरीता सर्वसाधारण स्त्री आरक्षण असल्याने या पदाकरिता संस्कृती राजेंद्र कुलापकर,सुलोचना दशरथ कोंबेकर व नयना दिपक तबीब हे उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 1 मध्ये सदस्य पदाकरिता सर्वसाधारण स्त्रि आरक्षण असून याकरीता सुमती निलेश चोगले व प्रज्ञा प्रविण साखरकर निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्र. 2 मध्ये सर्वसाधारण आरक्षण असून त्याकरीता सुनिल पांडुरंग घाडे, लक्ष्मीकांत यशवंत पाटील व विश्वजित चंद्रकांत पाटील हे निवडणूक रिंगणात समोरा समोर उतरले आहेत. याठीकाणी 991 मतदार मतदान करणार आहेत.
उन्हवरे ग्रामपंचायती मध्ये 7 सदस्य व सरपंच असे एकूण 8 करीता निवडणूक होणार असून या पैकी 5 जागा ग्रामस्थांनी बिनविरेाध दिल्या असून सरपंच पदा सह अन्य 2 सदस्य पदाकरीता निवडूणक होणार आहे.3 जागांकरीता 6 उमेदवार निवडणूक रिंगणात असून याठीकाणी शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी असे समोरासमोर निवडणूक लढवणार आहेत. सरपंच पदा करीता सर्वसाधारण आरक्षण असून या पदाकरीता कल्पेष गंगाराम अंबडसकर यांच्या विरोधार श्रीकृष्ण यषवंत जोशी परस्पर विरोधात उभे आहेत. प्रभाग क्रं3 मध्ये अनुसुचित जमाती करीता आरक्षण असून या ठीकाणी प्रकाश वसंत मुकना यांच्या समेार प्रविण प्रकाश वाघमारे निवडणूक लढवत आहेत. याकरीता रविवार दि. 5 रोजी मतदान होणार आहे.










