पालघर गावाचे शिमगोत्वाने जपला धार्मिक सलोखा

मंडणगड | प्रतिनिधी
तालुक्यातील पालघर गावचे शिमगोत्सवाने गावातील हिंदु मुस्लिम व बौध्द धर्मांचा सलोखा पिढ्यान पिढ्या टिकवला आहे गावाचे ग्राम देव व जननी मातेचे पालखी सालाबाद प्रमाणे सर्व वाड्यात फिरली. मोहल्ला बौध्दवाडी व पालघर गावठाण येथे भेट देऊन रंग पंचमीचा रंगाचा कार्यक्रम करुन ग्रामदेवाचा पालखी देवळात स्थानापन्न झाली ग्रामस्थही मोठ्या श्रध्देने देवाचे स्वागत करतात पालघर येथील युवा सामाजीक कार्यकर्ते इम्रान कर्देकर यांनी गावदेवाचे पालखीचे पंरपरेनुसार स्वागत केले. त्यांचे आजोबा हसन मिया अब्दुल रहमान कर्देकर वडील
हमीद हसन मिया करदेकर या दोघांनीही पंरपरा जपत पालखीचे स्वागत केले होते शिमगोत्सवाचे गावाचा धर्मिक सलोखा व एकोपा कायम राखल्याचे कर्देकर यांनी या निमीत्ताने सांगीतले