खेड(प्रतिनिधी) सुकीवली ग्राम पंचायती च्या प्रभाग १ मध्ये रिक्त असलेल्या १ जागे साठी रविवारी झालेल्या पोट निवडणूकित सौ दिव्या विशाल होळकर या २०७ मतांनी विजयी झाल्या सोमवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला प्रभाग सुकिवली क्र १ मधून सौ स्वरा संतोष साबळे यांना २२२ मतदान झाले तर सौ दिव्या विशाल होळकर यांना ४२८ मते मिळाली झालेले एकूण मतदान ६६० झाले होते सौ दिव्या विशाल होळकर २०७ मताधिक्यानी विजयी झाल्या
यावेळी सुकिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान ऊपसरपंच श्री बळीराम निकम व माजी सरपंच श्री विनायक निकम श्री शत्रुघ्न चाळके संतोष चाळके गणेश चाळके परेश जाधव प्रदिप चाळके तुकाराम साबळे मनोज साबळे किरण जाधव मनोहर जाधव बाळाराम धोत्रे यांनी मेहनत घेतली











