तळाशील तोंडवळी येथील पारंपरिक मच्छीमारांचे भरड नाका येथे उत्स्फूर्त स्वागत…

मालवण | प्रतिनिधी : तळाशील येथे पारंपरिक मच्छीमार व पर्ससीन धारक यांच्यात झालेल्या संघर्षानंतर अटकेत असलेल्या पारंपरिक मच्छीमारांची बुधवारी तुरूंगातून सुटका झाली. या सर्व मच्छीमारांचे शहरातील भरड नाका येथे मच्छीमारांच्या वतीने फटाके फोडून जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी पारंपरिक मच्छीमार एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. भरड येथील सन्मित्र रिक्षाचालक मालक संघटनेच्या वतीनेही पारंपरिक मच्छीमारांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजप जिल्हा पदाधिकारी रविकिरण तोरसकर, मिथुन मालंडकर, हरी खोबरेकर, बाबी जोगी, सन्मेष परब, भाऊ मोर्जे, भूषण जुवाटकर, प्रकाश करंगुटकर, नंदू वस्त यांच्यासह अन्य ग्रामस्थ,मच्छीमार उपस्थित होते. दरम्यान तोंडवळी तळाशील येथेही मच्छिमारांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.