फोंडाघाट येथे संयुक्त जयंती उत्सवानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न !!!
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी :
फ़ोडाघाट येथे भ. बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.त्याचा लाभ जवळपास ८५ बांधवानी घेतला. या कामी फोंडाघाट प्रा. आ. केंद्राचे डॉ. राम यादव व समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. केंद्रे यांनी रुग्णांची तपासणी करून योग्य उपचार केले. तसेच प्रत्येक रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. या कामी आरोग्य सेविका शर्मिला मडवी, पूर्वा मेस्त्री व आशा संचिता जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कणकवली येथील प्रसिद्ध स्त्री रोग व प्रसूती शास्त्र तज्ज्ञ डॉ. शमिता बिरमोळे यांनी स्रियांचे आजार व त्याबाबत घेण्याची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी केवळ स्त्रीयांचेच नव्हे तर पुरुषांचे अनेक आजार याविषयो उद्भभोदक माहिती देऊन त्यावरील उपचार पद्धती व घ्यावयाची दक्षता या विषयी मार्गदर्शन केले. उदा. कर्क रोग, पोट विकार, स्रियांचे गर्भ व स्तन कर्क रोग, मासिक पाळी इ. अनेक आजारांवर मार्गदर्शन केले. त्यांच्या सरस्वती फौंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या आरोग्य उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर आभार मानून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष, संतोष कदम, सचिव संतोष आखाडे, मिलिंद जाधव, तसेच मुंबई मंडळाचे कार्याध्यक्ष शैलेंद्र जाधव, रुचिता जाधव, महिला अध्यक्षा प्रियांका जाधव व विजय जाधव, रवींद्र जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रारंभी मान्यवरांचा पुष्प गुच्छ व शाल देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.








