भाजपाच्या लांजा शहराध्यक्षपदी गुरूप्रसाद तेली यांची निवड 

लांजा येथे पार पडलेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

लांजा (प्रतिनिधी) लांजा रेस्टहाऊस येथे पार पडलेल्या भाजपाच्या बैठकीत लांजा शहराध्यक्षपदी गुरूप्रसाद तेली यांची निवड करण्यात आली.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत लांजा शहर भाजपा व भाजपा शक्तीकेंद्र पदाधिकारी यांची बैठक लांजा येथे पार पडली. यावेळी संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली. यावेळी लांजा शहराध्यक्ष म्हणून गुरूप्रसाद तेली यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर , तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर , जिल्हा सदस्य विजय कुरूप , माजी तालुकाध्यक्ष मुन्ना खामकर ,माजी शहराध्यक्ष प्रमोद कुरूप ,जिल्हा सचिव हेमंत शेट्ये नगरसेवक मंगेश लांजेकर ,संजय यादव , नगरसेविका शीतल सावंत , जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक इक्बाल गिरकर ,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अजय गुरव , तालुकाध्यक्ष भटक्या विभूक्त जाती मयूर शेंडे, तालुका सरचिटणीस विराज हरमले, सरचिटणीस शैलेश खामकर ,अनंत उर्फ बाबू चव्हाण ,माजी जिल्हा परिषद सदस्य वृषाली कुरूप ,माजी तालुका अध्यक्ष शेखर सावंत , विशु जेधे, अभिषेक लांजेकर ,सुयोग तोडकरी ,बावा राणे ,अनिल कांबळे , अतुल आवलेगावकर , वाघोजी खानविलकर , अनंत चौगुले , रवींद्र नारकर आदी उपस्थित होते.