हा केवळ इव्हेंट नसून, शिवविचार जागृत ठेवण्याचा प्रयत्न — शिवशंभो कला-क्रीडा मंडळ.
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : श्रीशिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत असताना, वर्षभर संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, दीपावलीच्या पार्श्वभूमीवर, फोंडाघाट- माऊली मंदिर रस्त्याजवळील शिवस्मारका सभोवती संध्याकाळी ३५० पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. फोंडाघाट मधील काही वाड्यावरील आबालवृद्ध महिला- पुरुष-युवाई शिवस्मारकाकडे एकत्र आले.संध्याछायेच्या अंधुक प्रकाशात ३५० पणत्या पेटविण्यात आल्या. त्यावेळी स्मारकाचा परिसर आणि शिवतेज उजाळून निघाले. यावेळी हा केवळ इव्हेंट नसून, शिवतेजाचे पूजन- पावित्र्य आणि विचार नव्या पिढी समोर जागृत ठेवण्याचा मनोमन प्रयत्न आहे. शिवशंभो कला- क्रीडा मंडळ सदैव प्रयत्नशील असून, शिवप्रतिष्ठान-सिंधुदुर्ग या देशपातळीवरील संस्थेचे सदैव मार्गदर्शन लाभते, असे आश्वासक विचार मंडळाकडून काहींनी व्यक्त केले. यावेळी शिवस्तवन करून शिवतेजाला अभिवादन करण्यात आले. यावेळी अशोक लाड- अध्यक्ष, गुरुनाथ मेस्त्री- सेक्रेटरी, अनिल लाड- खजिनदार, आणि सर्वश्री सदस्य- सतीश खांबाळेकर, अशोक लाड, गणेश मेस्त्री,सचिन लाड, दिनेश लाड,विनोद लाड, सचिन लाड ,अनंत तळेकर आणि चार वाड्यावरील महिला- पुरुष, युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते…..