पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबीर ! 

लायन्स क्लब ऑफ कणकवलीचा उपक्रम

कणकवली : कणकवली लायन्स क्लबच्यावतीने पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर व चर्चा सत्राचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद लाभला.

 

या शिबिरामध्ये रक्तदाब ,मधुमेह तपासणी, स्ट्रेस व्यवस्थापन, आहार विहार,जिवनशैली यावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी लायन्स क्लबचे चार्टर प्रेसिडेंट डॉ. बाळकृष्ण महाडेश्वर यांनी मधुमेह कंट्रोल आणि रक्तदाब व तणाव यावर चर्चा व मार्गदर्शन केले, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ.प्रविण बिरमोळे यांनी दैनंदिन जीवनातील आहार, विहार ,जिवनशैली यावर उपाय याविषयी मार्गदर्शन केले. तर डॉ.शमीता बिरमोळे यांनी महिलांच्या विविध आजारांवर मार्गदर्शन केले.

उपस्थित सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक लायन्स क्लबचे सचिव प्रा. दिवाकर मुरकर यांनी केले. तर लायन्स क्लबच्या वतीने कणकवली पोलिस निरीक्षक तेजस नलवडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन डॉ. प्रविण बिरमोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या शिबीराचा लाभ पोलिस कर्मचारी व अधिकारी,होमगार्ड आदींनी घेतला.

या आरोग्य तपासणी शिबिरसाठी लायन्स क्लबचे उपाध्यक्ष विजय पोवार, विलास बुचडे, नंदू सावंत आदी उपस्थित होते, आभार गजानन पडळकर यांनी मानले.