खेड( प्रतिनिधी) राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) जिल्हा सरचिटणीसपदी तालुक्यातील हेदली गावचे सुपुत्र सरवर कुडुपकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तसे नियुक्तीपत्र दिले आहे. यापूर्वी ते राष्ट्रवादी युवकच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कार्यरत होते
. या पदाच्या माध्यमातून संघटना बांधणीसाठी केलेल्या योगदानाची दखल घेवून त्यांच्याकडे जिल्हा सरचिटणीस पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या भोस्ते गणाचे ते माजी अध्यक्षही होते. तसेच ग्रामपंचायतीचे माजी सदस्य देखील आहेत.
पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलून संघटना बळकट करण्यासाठी जोमाने काम करणार असल्याचे नूतन जिल्हा सरचिटणीस सरवर कुडुपकर यांनी सांगितले.
या निवडीबद्दल राष्ट्रवादीच्या दापोली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष अमित कदम यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.









