देवरुख येथील आमदार चषक कॅरम स्पर्धेचा शानदार प्रारंभ

देवरुख, रत्नागिरी येथील मराठा भवन येथे रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आयोजित आमदार चषक राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत पुण्याच्या अभिजित त्रिपनकरने ब्लॅक स्लॅमची नोंद करत मुंबईच्या मंगेश कासारेवर २५-८, २५-१५ असा विजय नोंदविला. तर पहिले मानांकन मिळविलेल्या मुंबईच्या महम्मद घुफ्रानने मुंबईच्याच निलेश परबवर २५-५, २५-५ असा एकतर्फी विजय मिळवून आगेकूच केली.

स्पर्धेचे उदघाटन स्थानिक लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी देवरूखचा आंतर राष्ट्रीय कॅरमपटू संदीप देवरुखकर, संगमेश्वर तालुका तहसीलदार अमृता साबळे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भरत चौगुले, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, उपाध्यक्ष यतिन ठाकूर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, सचिव मिलिंद साप्ते व स्पर्धा प्रमुख मोहन हजारे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे

गिरीश तांबे ( मुंबई ) वि वि राहुल (भस्मे रत्नागिरी ) २४-१०, २५-१५
रियाझ अकबरअली ( रत्नागिरी ) वि वि द्रोण हजारे ( रत्नागिरी ) २५-२, २५-०
हरेश्वर बेतवंशी ( मुंबई ) वि वि सुरज कुंभार ( मुंबई ) २५-९, २५-११
जलालुद्दीन मुल्ला ( सातारा ) वि वि आयुष गरुड ( पुणे ) २५-४, २५-९
सागर वाघमारे ( पुणे ) वि वि राजेश घोलप ( मुंबई ) २५-५, २५-५
प्रशांत मोरे ( मुंबई ) वि वि निलांश चिपळूणकर ( मुंबई ) २१-८, २१-१५
संदीप देवरुखकर ( मुंबई ) वि वि सुखबिंदर सिंग ( पुणे ) २५-१६, २५-१०
विकास धारिया ( मुंबई ) वि वि अनिल मुंढे ( पुणे ) २४-१६, २५-१०