खेड (प्रतिनिधी) जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने डेरवण क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेत भरणे – बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या इयत्ता ११वीतील पृथ्वी पाटीलने प्रथम क्रमांक पटकावला. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेत जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. प्रशालेतील पृथ्वी पाटील याने सायकलिंगमधील मास स्टार्ट या प्रकारात प्रतिस्पर्धकांना चुरशीची लढत देत अव्वलस्थान पटकावले. क्रीडाशिक्षिका शितल घाणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था चेअरमन बिपीन पाटणे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्यासह संस्था पदाधिकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले.








