खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील बहिरवली – चौगुले मोहल्ला येथे लागलेल्या आगीत अश्रफ अहमद चौगुले यांच्या
घराच्या नुकसानीचा आकडा १५ लाखांवर पोहचला आहे. शासनाने त्यांना तातडीने नुकसान भरपाई
द्यावी, अशी मागणी होत आहे. आगीत घरातील सर्वच साहित्य बेचिराख झाले आहे. येथील महसूल खात्याने तातडीने नुकसानीचा पंचनामा केला. त्यानुसार १५
लाखाचे नुकसान झाले आहे.
आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज आहे. सद्यस्थितीत चौगुले कुटुंब नातेवाईकांकडे आसऱ्याला आहे. चौगुले यांची बेताचीच परिस्थिती आहे. यामुळे चौगुले कुटुंबियांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.










