किल्ले राजकोट येथे छ्त्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी अंतिम टप्यात

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार नीलेश राणे यांच्याकडून पाहाणी

मालवण | प्रतिनिधी : मालवण किनारपट्टीवर साजरा होणाऱ्या नौदल दिन निमित्ताने किल्ले राजकोट येथे छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा 43 फूट उंच पुतळा उभारणी होत आहे. तसेच परिसर सुशोभीकरणसह किल्ले राजकोट पुनःबांधणी होत आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी खासदार नीलेश राणे यांनी शनिवारी केली. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सर्वगोड यांनी याठिकाणी सुरू असलेल्या कामाची माहिती देत काम अंतिम टप्यात असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजन तेली, दत्ता सामंत, अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, राजन वराडकर, महेश मांजरेकर, सौरभ ताम्हणकर, ललित चव्हाण, राकेश सावंत यासह अन्य पदाधिकारी शासकीय अधिकारी उपस्थित होते.

नौदल दिन साजरा होणाऱ्या तारकर्ली किनारपट्टी तसेच महानीय व्यक्ती येणाचे मार्ग तसेच हॅलिपॅड व्यवस्था पाहणी आढावा यावेळी घेण्यात आला.