खेड (प्रतिनिधी)गेल्या काही दिवसांपासून जिओ कंपनीच्या मोबाईल सेवेत व्यत्यय येत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. कोमात जाणाऱ्या जिओच्या सेवेमुळे संवादाची देवाणघेवाण करण्यास अडथळे निर्माण होत
आहेत.बीएसएनएल पाठोपाठ खासगी मोबाईल कंपनीच्या सेवेमध्ये व्यत्यय येण्याचे प्रमाण वाढत आहे.
बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाल्याने असंख्य ग्राहकांनी जिओ कंपनीची सेवा खरेदी केली आहे. मात्र जिओ कंपनीच्या सेवेतही, येणाऱ्या व्यत्ययाचा व्यत्ययाचा ग्राहकांना फटका बसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही क्षणी सेवा कोलमडत आहे. याबाबत जिओची सेवा खरेदी केलेल्या एजंटकडे एजंटकडे विचारणा केल्यानंतर थातूरमातूर उत्तरे दिली जातात. जिओ कंपनीने ही बाब गांभीर्याने घेवून सेवेतील व्यत्यय दूर करण्याची मागणी ग्राहकवर्गातून होत आहे.









