आमदार नितेश राणे यांचा पत्रकार परिषद संजय राऊत यांना इशारा
ठाकरे व पवार कुटुंबियांत काड्या लावणारा शकुनी मामा संजय राऊतच
जरांगेना कोणीही अटक करणार नाही आजूबाजूच्या लोकांनी चुकीची माहिती पसरवू नये
संतोष राऊळ (कणकवली)भाजप,संघ आणि आमच्या नेत्यांवर संजय राजाराम राऊत यांने चुकीच्या पद्धतीने टीका करणे थांबवावे,अन्यथा राऊत यांच्या घरात महाभारताचा जो एपिसोड चालू आहे त्याची वेगळी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांचे वस्त्रहरण करावे लागेल.असा इशारा भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी बोलतांना आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला.ते म्हणले.राऊत यांच्या स्वतःच्या घराची अवस्था, भावाची अवस्था, त्यांच्या घरातील महाभारत आम्ही सांगितले तर महाराष्ट्र तुझे तोंड बघणार नाही. ठाकरे व पवार कुटुंबियांत ज्या काड्या लावल्या त्यामुळे गलिच्छ राजकारण झालय.या सर्वांचा मुख्य सूत्रधार,शकुनी मामा संजय राजाराम राऊत आहे.संजय राऊत भगव्याच्या नावावर दलाली करणारा सर्वात मोठा दलालआहे.भगव्याच्या नावाने राजकारण करणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे सर्वात मोठे कलंक आहेत.असेही नीतेश राणे यांनी सुनावले.
आज सकाळी संजय राऊत ने अजित दादांची आणि एकनाथ शिंदेची स्क्रिप्ट भाजपा ची होती अशी टीका केली. भाजपाची नीती तालिबान सारखी असल्याचा जावई शोध राऊत ने लावला. मुळात मुघलांच्या वंशजांत जन्मलेला संजय राऊत आहे. त्याने प्रतींश नंदिना खासदारकी दिली गेली. तेव्हा बाळासाहेब ठाकरे व कुटुंबियाला बरबाद करीन असे सांगितले होते.मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंग झाल्यापासून ठाकरे व पवार कुटुंबियांत जे होतंय तो 1019 चा राग आहे.संजय राऊत स्वतःला मुख्यमंत्री करण्यासाठी शरद पवार यांचेकडे पायघड्या घालून होता. आणि ते झाले नाही म्हणून ठाकरेच्या सेनेत आणि पवार कुटुंबात काड्या लावल्या,आग लावली असे गलिच्छ राजकारण केले असल्याची टीका यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली.तेजस व आदित्य मध्ये जे वाद होतात त्याचा मुख्य सूत्रधार राऊत आहे. असेही ते म्हणाले.
राणेंना फक्त दोन मूल आहेत हे जगाला माहीत आहे. मात्र संजय राऊत स्वतःला दोन मुली आहेत हे आत्मविश्वासाने बोलू शकतो का? असा सवाल केला.
मनोज जरांगेना कोणीही अटक करणार नाही. उगाच कोण तुमचे कान भरत असेल तर ते ऐकू नका.लागलेच तर तुमची बाजू सत्कार कडे नितेश राणे मांडेल. तुमचा भाऊ सरकार मध्ये आहे असे जरांगे पाटील यांच्या विषयी बोलताना सांगून,मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करून हिंदू समाजात वाद पेटवण्याचे काम जिहादी करत आहेत.त्याला आमच्यातील काही फितूर लोक मदत करत आहेत.राम मंदिर मुळे हिंदू एकत्र येतील अशी भीती असल्याने आमच्यातील गद्दारांना एकत्र घेऊन जिहादी वाद निर्माण करत आहेत.असा आरोप केला.











