ज्येष्ठ नागरिकांचाही विशेष गौरव
सावंतवाडी । प्रतिनिधी : माजगाव नाईकवाडा येथे सत्यनारायण महापूजा आणि चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ यांचे दशावतार नाटक आयोजित केले होते. या कार्यक्रमाच्यावेळी दरवर्षीप्रमाणे 75 वर्षे झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा नाईकवाडा ग्रामस्थांतर्फे सन्मान करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत आणि पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांचाही सत्कार करण्यात आला.
यानंतर देवेंद्र नाईक प्रस्तुत नाट्य मंडळाने उत्कृष्ट प्रकारे नाटक सादर केले. त्यांनी केलेल्या नाटकाला प्रेक्षकांची वाहवा मिळाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी गावाच्या विकासासाठी सदैव कटिबध्द असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी विठ्ठल सावंत,संजय कानसे, अजय सावंत,संजय सावळ,सचिन गावडे,अशोक दळवी,बाबुराव तेंडुलकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












