बाळासाहेबांची शिवसेना, पक्षाचे विचार, अस्तित्व, भूमिका आणखी मजबूत! अन्य राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही यश मिळणार!
काही शिवसैनिक संभ्रमात, त्यापेक्षा दुःखी आहेत! पण त्यातून बाहेर पडून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल होतील.
विधान परिषद उपसभापती नीलम ताई गोऱ्हे
सिंधुनगरी l बाळ खडपकर :विरोधकांची गैरसमज पसरणारी केलेली चर्चा, व प्रसार माध्यमानी भाजप विरोधी मांडलेली गणीते, यावर गैरसमज करून न घेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून राजस्थान मध्यप्रदेश छत्तीसगड या राज्यातील मतदारांनी मतदान केले. या निवडणूक निकालावरून भारतीय जनता पक्षाच सर्वसामान्य जनतेसाठी एक व्यवस्था निर्माण करतोय हे ही आता सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहे, हे या निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातही हेच यश मिळेल असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती आमदार नीलम ताई गोऱ्हे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
पुढे त्या असे म्हणाल्या 50 आमदार व 13 खासदार शिवसेनेच्या भूमिकेला चिकटून राहून पक्ष नेतृत्वाला बाजूला करतात व बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं शिवशाहीच सरकार हाती घेतात! व शिवसेना पक्ष पक्षाच अस्तित्व, पक्षाचे चिन्ह, पक्षाचे विचार आणखी मजबूत करतात तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये सहभागी होताना व काम करताना प्रेरणा मिळत असल्याचेही त्याने स्पष्ट केले, व बाळासाहेबांना अभिप्रेत असलेल्या विचाराना शिवशाहीची ध्येय धोरण सुरू ठेवणाऱ्या नेतृत्वाला सहकार्य करण्यासाठीच आपण शिंदे सरकार मध्ये सहभागी झालो व मूळ शिवसेनेचा झेंडा हाती घेतला! खरे तर झापड बांधलेले व चकवा मारलेले नेतृत्व बाळासाहेबांचे विचार सोडतात तेव्हा एकनाथ शिंदे सारखे नेतृत्व बाळासाहेबांचे विचार पुढे नेतात त्या नेतृत्वाला समर्थन करणे ही माझी जबाबदारी म्हणून मी या गटात सहभागी झाले, बाळासाहेबांचे विचार जपणारे व त्यांना आदर्श मानणारे शिवसैनिक व शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासारख्या चुकीच्या नेतृत्वामुळे पक्ष सोडून बाजूला गेले व दुसऱ्या पक्षात नेतृत्व यशस्वीपणे करत आहेत अशी खंतही नीलम ताई गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली सन 1995 ते 99 च्या काळात शिवसेनेने शिवशाहीचा सरकार महाराष्ट्रातील जनतेसाठी केल होत. झापड बांधलेलं व चकवा मारलेलं नेतृत्व आलं वा बाळासाहेबांचे विचार सोडून पक्षाच्या भूमिकेला व विचाराला तिलांजली देऊन शिवसेनेच्या नेतृत्वाने सरकार चालवलं. म्हणूनच बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे 50 आमदार तेरा खासदार या नेतृत्वाला सोडून बाजूला गेले व बाळासाहेबांच्या विचारांची मूळ शिवसेना त्यांनी आणखी मजबूत केली, पक्षाची भूमिका पक्षाचे चिन्ह अबाधित ठेवलं याचा आपल्याला अभिमान असून म्हणूनच आपण शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यासाठी या प्रवाहात सामील झाले. 2002 पासून मी शिवसेनेची आमदार असून बाळासाहेबांचे विचार व शिवसेनेची भूमिका व त्यांना अभिप्रेत असलेल्या सरकार चालविण्यासाठी आपण यात सहभागी झालो. आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता नीलम ताई म्हणाल्या खरंतर बालिश व पोरकट असलेल्या असलेल्या नेतृत्वाला हे विचार समजायला अवघड आहेत, संजय राऊतही याच मार्गाने गेले. त्यामुळे या नेतृत्वाची भूमिका चुकल्यामुळे या नेतृत्वाची फरपट झाली आहे. व अशा चुकीच्या भूमिकेमुळे या सर्वांचे परतीचे दरवाजे बंद झाले असेही नीलम ताई म्हणाल्या.
सिंधुदुर्गातील व कोकणातील शिवसेना आणखी मजबूत करण्यासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्योग मंत्री उदय सामंत या नेत्यांची आपला सततचा संपर्क आहे. शिवसेनेच्या सभासद नोंदणीचे अभियानही लवकरच हाती घेतले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे सरकार चालवताना अनेक योजना राज्यात हाती घेतल्या. महिलांना प्राधान्यक्रम देताना एसटीमध्ये 50% सवलत जाहीर करत मोठा सन्मान दिला आहे. लेक लाडकी यास महिलांच्या विविध योजना राबवून शिंदे सरकारने महिलांमध्ये व जनतेमध्ये विश्वास निर्माण केला आहे. शिवसेनेचे विचार शिवसेनेची भूमिका कायम ठेवली आहे. काही शिवसैनिक या राजकीय प्रवासामध्ये संभ्रमामध्ये आहेत असतीलही पण ते खरे दुःखी आहेत असे मी मानते, मात्र बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व ते पुढच्या काळात मान्य करतील व या शिवसेनेत सहभागी होतील असा विश्वासही नीलम ताई गोरे यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व करताना सर्वसामान्य जनतेसाठी केलेले काम फार मोठे आहे. सर्वसामान्य जनतेसाठी काय हवे आहे यासाठी राबविले व्यवस्था व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविलेल्या योजना यामुळेच राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड या राज्यातील मतदारांनी भाजपला चांगला कौल दिला. या नेतृत्वाने महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करून महिलांना फार मोठा सन्मान दिला आहे. 370 कलम रद्द केल,सर्व धर्म पंथाच्या महिलांना समान न्याय दिल्यामुळे व महिलांसाठी विविध योजना हाती घेतल्यामुळे महिलांचा सन्मान व त्यांच्या विकासाचा मार्ग निर्माण केल्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व शाश्वत विकास करू शकतो असा विश्वास आता सर्वसामान्य जनतेला वाटू लागला आहे व त्यामुळेच हे यश मिळू लागल्या आहे. महाराष्ट्र राज्यातही हेच सकारात्मक चित्र आगामी काळात दिसेल असा विश्वास आहे त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
मराठा आरक्षण अवकाळी पाऊस महिला विषयक गुन्हे अशा विषयावर सात ते वीस डिसेंबर या काळात होणारे हिवाळी अधिवेशन लक्षवेधी ठरेल, या अधिवेशनात विक्रमी प्रश्नांवर चर्चा होईल, व त्यावर चांगले निर्णय होतील. या अधिवेशनात विरोधकाने विरोधासाठी किंवा अधिवेशन चालू न देण्यासाठी विरोध करू नये. जर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करायची असेल तर त्यावर चर्चा करावी वा अनेक प्रश्न मार्गी लावावेत केवळ विरोधासाठी विरोध नको असे आवाहनही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांनी केले.
बॉक्स
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कारभारा बाबत येत्या अधिवेशनात चर्चा होणार!
सिंधुनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व डीन च्या मनमानी कारभाराविरोधात नीलम ताई गोऱ्हे यांचे लक्ष वेधतात त्याने याबाबत येत्या अधिवेशनात चर्चा करन अधिवेशन काळात आवश्यकता सूचना देऊन कार्यवाही करू अशी ग्वाही दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांची होत असलेली गैरसोय व येथील गंभीर परिस्थिती बाबत मुख्यालय पत्रकार संघाने आंदोलन करण्याचा घेतलेला निर्णय याबाबत त्यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी त्यांनी या परिस्थितीबाबत विस्तृत माहिती घेतली. वा अधिवेशन काळात या विषयात चर्चा करू व निर्णय घेऊ अशी ग्वाही ही त्यांनी दिली.












