चिपळूण एकता विकास मंचतर्फे १० रोजी महाआरोग्य तपासणी शिबीर

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण एकता विकास मंचच्या वतीने महाआरोग्य तपासणी शिबीर दिनांक १० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत सती हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले आहे. या वर्षातील हे दुसरे महाआरोग्य शिबीर आहे.

या शिबिरात नाडी, प्रकृती परीक्षण, श्वसन क्षमता चाचणी, मधुमेह, हृदयविकार, हृदय आलेख (इ.सी.जी.), उच्च रक्तदाब तपासणी उपचार मार्गदर्शन, आहार विहार, पंचकर्म प्राणायाम, योगासन मार्गदर्शन, ताणतणाव व्यवस्थापन केले जाणार आहे. याशिवाय रोग प्रतिकारक क्षमता, स्त्री विकार, अस्थी विकार, संधीवात तपासणी व उपचार मार्गदर्शन, महिला सर्जन सल्ला व मार्गदर्शन, दृष्टीदोष, तिरळेपणा, मोतीबिंदू या आजारावर नेत्र विकार तज्ज्ञ डॉक्टर सल्ला व मार्गदर्शन, हर्निया अपेंडिक्स, मुतखडा निदान व मार्गदर्शन केले जाणार आहे. या शिबिरात डॉ. हर्षद होन (मधुमेह, हृदयरोग सल्ला तज्ज्ञ) डॉ. सद्गुरु पाटणकर (सर्जन), डॉ. भक्ती पलांडे (सर्जन), डॉ. श्रीश भास्करराव (अस्थि्वीकार तज्ज्ञ), डॉ. राधा मोरे (आयुर्वेदाचार्य), डॉ. रजनीश रेडीज, डॉ. प्रसाद गडकरी, डॉ. राजू वर्मा (वैद्यकीय अधिकारी) हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. शिबिरात सोनोग्राफी, सिटीस्कॅन, स्ट्रेस टेस्ट, HBA1C, XRAY, 2D ECHO आदी टेस्ट केल्या जाणार आहेत.

रक्त तपासणीसाठी विशेष सवलत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे कोकण रेल्वे कर्मचारी, माजी सैनिक व पोलिसांसाठी हे शिबीर विनामूल्य असणार आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच कॅशलेस सुविधा उपलब्ध असणार आहे. शिबिरामध्ये नावनोंदणीसाठी, शिरीष काटकर (९७३०१६९३९८), डॉ. यतीन जाधव (९७३०९०६२१६), सौ. दिशा दाभोलकर (९८९०२९३३९५), राजू जाधव (७७६९९८३०५३), अजय भालेकर (९८२२१७५५३७), सौ सई चव्हाण (९८०३६८९९८३), मनोज शिंदे (९८५००६८५३०७), किसन चिपळूणकर (९८२२१५८२३५), सौ. सफा गोठे (९१५८६९८६४४) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. त्याचबरोबर हे शिबीर उस्फुर्त प्रतिसादात पार पडेल असा विश्वास संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष काटकर यांनी व्यक्त केला आहे.