खेड-शिवतर रोड येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

खेड | प्रतिनिधी : खेड शहरातील  शिवतररोड येथील विवाहितेने  अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार ४ डिसेंबर रोजी दुपारी ३ वा. सुमारास उघडकीस आली.
मनाली मंगेश खेडेकर (रा. शिवतररोड खेड, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सोमवारी दुपारी तिने राहत्या घराच्या हॉलमधील सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब तिच्या भावाच्या लक्षात येताच त्याने तिला खाली उतरवून उपचारासाठी रॉयल हॉस्पिटल भरणे येथे दाखल केले असता तिथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.