चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची भक्कम भरारी!

मार्च २०२६ अखेर ४२ कोटी ७५ लाख व्यवसायिक नफा व २३११ कोटींचा व्यवसाय
३२ वर्षांत विश्वासार्ह प्रगती; सभासदसंख्या, ठेवी, कर्जव्यवहार व सामाजिक उपक्रमांत सातत्यपूर्ण वाढ
चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने केवळ ३२ वर्षांच्या कार्यकाळात सर्वसामान्यांच्या अढळ विवासाच्या भक्कम पायावर उभी राहत उल्लेखनीय आणि दिमाखदार प्रगती साधली आहे. सहकार क्षेत्रातील भरीव आणि उत्कृष्ट योगदानाची दखल घेत संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांना मिळालेला आर्दा जीवन गौरव पुरस्कार आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या महिला अधिकारी म्हणून पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांना मिळालेला बेस्ट सीईओ पुरस्कार हे संस्थेच्या प्रगतीच्या वाटचालीचे ठळक प्रतिक ठरले आहेत. मार्च २०२६ अखेर संस्थेला ४२ कोटी ७५ लाखांचा व्यावसायिक नफा झाला असून, संस्थेने २३११ कोटींच्या व्यवसायाचा टप्पाही पूर्ण केला आहे. प्रत्येक वर्षागणिक संस्थेच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत चालला आहे, ही बाब सर्वसामान्य ठेवीदारांच्या दृष्टीने अत्यंत समाधानकारक आणि विवासार्ह असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
मार्च २०२६ अखेर संस्थेची सभासद संख्या १ लाख ४६ हजार ६८२ इतकी असून भाग भांडवल ८४ कोटी तर एकूण स्वनिधी १८२ कोटी इतके आहे. केवळ ३२ वर्षांच्या कालखंडात सभासदसंख्या, भाग भांडवल व स्वनिधी या तिन्ही क्षेत्रांमध्ये लक्षणीय वाढ साधत राज्यातील निवडक अग्रगण्य संस्थांमध्ये चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. संस्थेच्या ठेवी १२४५ कोटी असून एकूण कर्जव्यवहार १०६६ कोटी आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय २३११ कोटींचा असून तो या वर्षात २५०० कोटींच्या टप्प्यापर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट संस्थेने निचित केले आहे.
मागील आर्थिक वर्षाप्रमाणे यावर्षीही संस्थेने व्यवसायवाढ आणि नफा क्षमतेतील सातत्य प्रभावीपणे कायम राखले आहे. कोविडच्या अत्यंत कठीण काळातसुद्धा संस्थेने आपले कामकाज अखंडित ठेवत ग्राहकांना नियोजनबद्ध, नम्र आणि जलद सेवा पुरविली आहे. शासनाने निर्धारित केलेल्या आदर्श प्रमाणांचे काटेकोर पालन करण्यासाठी राबविण्यात आलेल्या सुयोग्य नियोजनामुळे सर्वच निकषांमध्ये संस्थेने उल्लेखनीय आणि यशस्वी कामगिरी नोंदवली आहे.
संस्थेच्या आर्थिक सक्षमतेचा पाया अत्यंत भक्कम असून, संस्थेचे एकूण स्वनिधी १८२ कोटी इतके आहे. आर्थिक बळकटीसह सामाजिक बांधिलकी जपण्यातही संस्थेला लक्षणीय यश प्राप्त झाले आहे. सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देतानाच ठेवीदारांनाही त्यांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा देण्याची धोरणात्मक भूमिका संस्थेने कायम ठेवली आहे. गेली २७ वर्षे संस्था आपल्या सभासदांना त्यांच्या भागभांडवलावर १५ टक्के डिव्हिडंड सातत्याने देत आहे. आर्थिक सक्षमतेबरोबरच संस्थेच्या सभासदांच्या हितासाठी प्रतिवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. सभासदांच्या मुलांना रोजगार व स्वयंरोजगार देण्यासाठी त्यांच्या व्यवसाय वृध्दीसाठी सुलभ पद्धतीने अर्थ पुरवठा करण्याबरोबरच त्यांना मार्गदर्शन करणेसाठी सातत्याने वेगवेगळया क्षेत्रातील तज्ज्ञांची माहितीपर, मार्गदर्शनपर व्याख्याने ठेवण्यात येत असतात. या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासदांना शेतीपूरक जोडधंदा उपलब्ध व्हावा, यासाठी संस्थेने पुढील ५ वर्षांत किमान ५००० शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची जोड देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा उपक्रम कार्यान्वित केला असून त्याला संस्थेच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात फार मोठया प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण लघुउद्योजकांना प्रोत्साहन देत पर्यटन व्यवसायाशी संबंधित पूरक उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. या माध्यमातून छोटे-मोठे व्यवसाय उभारून ग्रामीण बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून पुढील ५ वर्षात १०००० बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे व्यापक कार्य सुरू आहे.
समाजातील अल्प उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न गटातील घटकांच्या भविष्यातील स्वप्नांना आकार देण्यासाठी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने विविध ठेव योजना प्रभावीपणे कार्यान्वित केल्या आहेत. लहान मुलांमध्ये बचतीची सवय रुजविण्यासाठी “धनलक्ष्मी ठेव”  ही अभिनव योजना सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत ४४००० हून अधिक लहान मुलांच्या पालकांनी त्यांच्या बचतीची खाती उघडली आहेत. ही योजना लहान मुलांमध्ये बचतीचे संस्कार रुजविणारी आगळी-वेगळी आणि प्रेरणादायी ठरली आहे. या खात्यांमध्ये दरमहा सरासरी २६ लाखांहून अधिक रक्कम जमा होत असल्याचे विशेष  उल्लेखनीय आहे.
याशिवाय अल्प व मध्यम उत्पन्न गटातील सभासदांना त्यांच्या भविष्याची स्वप्ने साकार करण्यासाठी १ वर्षापासून १० वर्षांपर्यंत कालावधीच्या एकूण अकरा (११) आवर्तक ठेव योजना प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आल्या असून, या योजनांचे ५४०० हून अधिक खातेदार आहेत. दरमहा साधारण ६ कोटी ५० लाखांहून अधिक रक्कम त्यांच्या आवर्ती ठेव खात्यांमध्ये जमा होत आहे. समाजातील सर्वच घटकांचा विचार करणाऱ्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने गृहिणींनाही बचतीचे नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी  “सुकन्या ठेव” व  “गृहलक्ष्मी ठेव” या नव्या योजना सुरू करण्यात आल्या. तसेच केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना सप्ताहनिमित्त ५ जुलै २०२५ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि चिपळूण नागरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ जून २०२५ रोजी  “एक पेड माँ के नाम“ हा शासनाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
संस्थेच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत विविध मान्यवरांनी वेळोवेळी भेट देत संस्थेला शुभेच्छा दिल्या आहेत. माजी केंद्रीय कृषी मंत्री मा. शरदचंद्र पवार साहेब, रेल्वे मंत्री मा. सुरेश प्रभू साहेब, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व मराठी भाषा व उद्योग मंत्री मा. श्री. उदयजी सामंत साहेब, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. नारायणराव राणे साहेब, तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीणजी दरेकर साहेब, कोकण पदवीधर विधान परीषद आमदार श्री. निरंजन डावख्ररे साहेब, लांजा-राजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण सामंत साहेब,  महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले साहेब यांनी प्रत्यक्ष भेटीदरम्यान चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्याचा गौरव करुन कौतुकाची थाप दिली आहे. सन २०२३-२४ या कालावधीत उत्कृष्ट कामकाज करणारी सहकारी पतसंस्था म्हणून दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी “कोकण पतसंस्था भूषण“ पुरस्काराने संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे. देशपातळीवरील नामांकित वृत्तपत्र समूह असलेल्या नवभारत-नवराष्ट्र वृत्तपत्रसमूहातर्फे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मा. सुभाषराव चव्हाण साहेब यांना ५ एप्रिल २०२६ रोजी “आदर्श जीवन गौरव“ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबईतर्फे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांना ३ एप्रिल २०२६ रोजी “बेस्ट सीईओ“ पुरस्काराने गौरविण्यात आले. या गौरवांनी संस्थेच्या शिरपेचात मानाचे नवे तुरे खोवले गेले आहेत.
संस्था आपल्या सभासदांच्या हिताचे रक्षण करीत असतानाच सहकारातील अन्य संस्थांनाही मार्गदर्शन व शिक्षण-प्रशिक्षणाची सोय व्हावी, यासाठी संस्थेने अद्यावत सहकार प्रशिक्षण केंद्र सुरू केले असून या प्रशिक्षण केंद्रामार्फत सातत्याने प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून चालू आर्थिक वर्षात दि. ०९.०६.२०२५ रोजी “सहकार मेळावा”, दि. ०७.०९.२०२५ रोजी “सहकार कार्यशाळा” तसेच संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त दि. १५.१०.२०२५ रोजी “सहकार मेळावा” घेऊन शिक्षण, प्रशिक्षण व मार्गदर्शनाचे काम केले आहे व असेच काम संस्था अखंडपणे करत आहे.
सहकाराच्या मूळ उद्देशाप्रमाणे समाजातील आर्थिक दुर्बल व वंचित घटकांसाठी आर्थिक आधार देणेसाठी व त्यांना बचतीची सवय लागावी यासाठी “सहकार समृध्दी” हा महत्त्वाकांक्षी संकल्पपूर्ती आराखडा तयार करण्यात आला असून तो यशस्वीपणे राबवण्यासाठी संस्थेच्या सर्व हितचिंतकांचा, सभासदांचा आणि सहकाराबद्दल आत्मीयता असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग मिळत असून नियोजित उद्दिष्ट पूर्ण करण्याची परंपरा आपण याही बाबतीत सिद्ध करू. “आपली माणसे-आपली संस्था” हे ब्रिदवाक्य खऱ्या अर्थाने सिद्ध करण्यात सहकार्य करणारे ठेवीदार, ग्राहक, संचालक, समन्वयक व कर्मचारी वर्ग यांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांना संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. सुभाषराव चव्हाण यांनी धन्यवाद दिले.