खेड(प्रतिनिधी) वंदेमातरम् संघटना संचलित समिधा सोशल अँड वेल्फेअर फाउंडेशन कडून भरने मध्ये वंदेमातरम् वाचन संस्कृती चळवळ* सुरू केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवभारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज भरणे येथील र. बा. जाधव व शामराव पेजे वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाटपाचा कार्यक्रम करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली,
याप्रसंगी कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष. श्री गोवळकर सहसचिव श्री धुमक , वस्तीगृहाचे अधीक्षक श्री गोरिवले , तसेच वंदेमातरम् विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व समिधा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री लेशपाल जवळगे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिरीषकुमार खोपकर तसेच समिधा फाउंडेशनचे खजिनदार श्री स्वप्नील बैकर व पप्प्या आखाडे,आदित्य कोठारे, पराग रुके, अभिनय भोजने, अथर्व धुमाळ,रितेश बिर्जे,यश फाटे,अमोल जवळगे व किरण भुसारे आदी मान्यवर उपस्थित होते.










