रत्नागिरीतील ज्येष्ठ बॅडमिंटनपटू, प्रशिक्षक मदन चव्हाण यांचे निधन

रत्नागिरी : रत्नागिरीमधील जेष्ठ बॅडमिंटन खेळाडू आणि जेष्ठ प्रशिक्षक मदन चव्हाण सर यांचे शनिवारी 9.12.2023 रोजी सायंकाळी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज रविवारी 10.12.2023 रोजी सकाळी खालची आळी, रत्नागिरी येथील त्यांचे निवासस्थानापासून निघाली. मदन चव्हाण यांच्या निधनाबद्दल क्रीडाप्रेमी, रत्नागिरीकर यांच्याकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.