खेडमध्ये रविवारी संत गाडगेबाबा सभागृहाचे उद्घाटन

 

खेड (प्रतिनिधी) खेड संत गाडगेबाबा परिट समाज संस्थेच्यावतीने लोकवर्गणीतून कुंभारआळी येथे उभारण्यात आलेल्या संत गाडगेबाबा सभागृहाचे उद्घाटन १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे.

याप्रसंगी आमदार रवींद्र वायकर, उद्योजक व आरक्षण समितीप्रमुख आशिष कदम, धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तुषार रंधे, अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय युवा उपाध्यक्ष सोनल शिंदे, संत गाडगेबाबा परिट समाज संस्थेचे अध्यक्ष अशोक जांभुळकर, महाराष्ट्र धोबी समाज आरक्षण समन्वय समितीचे जिल्हाप्रमुख संतोष शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यानिमित विविधांगी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे