टीपी आणि डीपी प्लान बद्दल सुशांत ऊर्फ बाबू नाईक यांनी अभ्यास करावा
आमदार वैभव नाईक हे आमदार भरत गोगावले यांचा कोट कधीही घालू शकतील
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती
कणकवली :आमदार वैभव नाईक हे आमदार भरत गोगावले यांचा कोट कधीही घालू शकतील. नाईक हे गोबेल्स नीती चा वापर करत मोठे झाले.माजी नगरसेवक सुशांत ऊर्फ बाबू नाईक म्हणजे वय वाढत असेल तरी बुद्धी बाबुचीच असलेली व्यक्ती टीपी आणि डीपी प्लान बद्दल त्यांना काही कळत त्यांचे वक्तव्य म्हणजे बालिश बाबू नाईकांचा बडबडला असेच मानावे लागेल.असा टोला माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला.यावेळी माजी नगरसेवक अजय गांगण उपस्थित होते.
डीपी आणि टीपी प्लान मधील फरक सुशांत नाईक यांना समजत नाही. त्यामुळे त्यांना आतापर्यंत आपण सर्व व आमदार वैभव नाईक देखील बाबू म्हणत आहेत. त्यामुळेच ते बालिश बाबू आहेत असा आरोप करत माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी सुशांत नाईक यांच्यावर जोरदार फटकेबाजी केली. कणकवली मध्ये संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेवून ते बोलत होते.
सुशांत नाईक यांनी टिपी प्लान मंजुरी बाबत जे बोलला त्यांना बालिश बाबू आहे. विकास आराखडा कणकवली शहराचा नागरिकांना बाजूला ठेवून केला जाणार नाही. विकास आराखडा चा फक्त एल यू मंजूर झालेला आहे. त्यांवर सूचना हरकती घेतल्या जातील त्यानंतर हरकतींवर सुनावणी होईल.त्यानंतर तो सर्व स्टेप पूर्ण करून आराखडा केला जाईल.
हा झाला विकास आराखडा tp स्कीम कणकवली शहरांसाठी आली. ती राज्यात सर्वत्र आली. मालवण आणि कणकवली या दोन शहरात ही tp स्कीम मंजूर केली आहे.
Tp स्कीम म्हणजे काय ? भुधारकांनी शासनाकडे प्रस्ताव करून ग्रीन झोन सोडवून एलो झोन करण्याची ही योजना आहे. त्यासाठी ही योजना महत्वपूर्ण आहे.
विकास आराखडा आणि tp स्कीम यांचे ज्ञान नाईक यांना नाही.नाईक यांना नागरिकांचे भले झालेले नको आहे काय ?असा सवालही यावेळी नलावडे व हर्णे यांनी केला.
सुशांत उर्फ बाबू नाईक यांना Dp प्लान जेव्हा मंजूर होवून येईल तेव्हा त्याचे श्रेय आम्हालाच द्यावे लागेल.त्यामुळे बाबू नाईक यांनी आधी नगरपंचायत चा अभ्यास करावा आणि येत्या निवडूनिकित नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी असे आव्हान यावेळी दिले.
यावेळी माजी नगरसेवक अजय गांगण उपस्थित होते.












